In Buldana district, farm grants are stagnant
In Buldana district, farm grants are stagnant 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान रखडले

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे शेततळे खोदण्याअगोदर पूर्व संमती या शेतकऱ्यांना देण्यात आली होती. तरीही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करण्याच्या उद्देशाने हे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविले जाते. यात नवीन फळबागांची लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुजीवन, सामूहिक शेततळे खोदून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेडनेट हाउसमध्ये नियंत्रित शेती, सेंद्रिय शेती असे विविध उपक्रम राबविले जातात. सन २०१४-१५ पासून केंद्र शासनाचे हे उपक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राबविले जात आहेत.

या अंतर्गत जिल्ह्यात मेहकर तालुक्यात जानेफळ परिसरातील घुटी व इतर गावात शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळे खोदले. ३४ बाय ३४ आकाराच्या शेततळ्यासाठी पाच लाखांवर खर्च केलेला आहे. हे शेततळे खोदण्यासाठी शासनाकडून पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात या शेततळ्यांचे खोदकाम, प्लॅस्टिक अस्तरीकरण पूर्ण केले. यासाठी शेतकऱ्यांचा पाच लाख रुपयांवर खर्च झालेला असून काही जणांनी हातउसनवारी करून पैसे जमवीत ही कामे पूर्ण केली.

आता या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शासनाने सर्वच शासकीय योजनांना कात्री लावलेली आहे. मे महिन्यापासून तर योजनांच्या कामांना पूर्वसंमतीही देणे थांबविण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी ज्या कामांना पूर्वसंमती दिलेली आहे त्यांचे अनुदान तातडीने दिले जावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

मी ३४ बाय ३४ आकाराचे शेततळे खोदून आता तीन महिने लोटले आहेत. याचे अनुदान अद्यापपर्यंत मिळालेले नाही. शासनाने सध्याच्या अडचणीच्या काळात हे अनुदान जमा करावे, अशी आमची मागणी आहे. - महादेव पाटील, घुटी, ता. मेहकर जि. बुलडाणा

एकात्मिक फलोद्यानअंतर्गत खोदलेल्या शेततळ्यांची मोका तपासणी केली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असून अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. - सत्येंद्र चिंतलवाड, तालुका कृषी अधिकारी मेहकर, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT