बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत दुष्काळी सवलती
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत दुष्काळी सवलती 
मुख्य बातम्या

बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत दुष्काळी सवलती

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती तयार झाली अाहे. शासनाने १३ पैकी ७ तालुक्यांत गंभीर व एका तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला अाहे. याशिवाय उर्वरित तालुक्यांतील २१ महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर केला असून, या ठिकाणी शासनाकडून दुष्काळी सवलती लागू करण्यात अाल्या अाहेत.  

या सवलतींमध्ये प्रामुख्याने जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदींचा समावेश आहे.

जिल्ह्यात या खरीपात मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, लोणार, सिंदखेडराजा या सात तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा, तर मोताळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. त्याचप्रमाणे सहा नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार बुलडाणा तालुक्यातील साखळी व म्हसला, चिखली तालुक्यातील एकलारा, कोलारा, धोडप, पेठ, शेलगाव अटोळ, चांधई, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा, मेहकर तालुक्यांतील जानेफळ, शेलगाव देशमुख, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, नायगाव दत्तापूर, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, वडशिंगी व आसलगाव या २१ महसूल मंडलांत दुष्काळ घोषित केला आहे.

शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून सवलती लागू करण्यास मंजुरी दिल्याने मलकापूर, नांदुरा,  खामगाव, शेगाव, संग्रामपूर, लोणार, सिंदखेडराजा, मोताळा, बुलडाणा तालुक्यातील साखळी, म्हसला, चिखली तालुक्यातील एकलारा, कोलारा, धोडप, पेठ, शेलगाव आटोळ, चांधई, मेहकर तालुक्यातील जानेफळ, शेलगाव देशमुख, दे.माळी, वरवंड, लोणी गवळी, नायगांव दत्तापूर, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाराजा, तुळजापूर, मेहुणाराजा, अंढेरा, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, वडशिंगी व आसलगाव या महसूल मंडलांमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे सवलती दिल्या जात अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT