दोन्ही काँग्रेसची आज संयुक्त बैठक
दोन्ही काँग्रेसची आज संयुक्त बैठक 
मुख्य बातम्या

दोन्ही काँग्रेसची आज संयुक्त बैठक

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त बैठक आयोजित केली आहे. आज (ता.६) होणाऱ्या या बैठकीत सरकारच्या विरोधात मोट बांधण्याबरोबरच आगामी निवडणुका आघाडी करून लढण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.  अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. त्याच धर्तीवर राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासोबतच आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षानी मिळून नुकतीच संविधान बचाव रॅली काढली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार पुढची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल अशी शक्यता  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT