parbhani photo
parbhani photo  
मुख्य बातम्या

आम्ही शेतकरी कंपनीकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसचे वाटप 

टीम अॅग्रोवन

परभणी ः मांडाखळी (ता. परभणी) येथील आम्ही शेतकरी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केलेल्या ९०० क्विंटल सोयाबीनवर प्रतिक्विंटल ५० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचे बुधवारी (ता.३) वाटप केले.  या वेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे (आत्मा) प्रकल्प उपसंचालक खंडेराव सराफ, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, आम्ही शेतकरी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचे प्रणेते प्रा. किरण सोनटक्के, सरपंच नागेश सिराळ, उपसरपंच शेख मौसीन उपस्थित होते. प्रा. सोनटक्के म्हणाले, की कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गावातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविणार आहोत. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात राजुसिंह ठाकूर, नरेंद्रसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर रोडगे, गजानन जनकवार, कारभारी कणे यांना सोयाबीन खरेदीचे बोनस वाटप करण्यात आले. 

सूत्रसंचालन प्रवीण सोनटक्के यांनी तर आभार शिवशंकर डोळसे यांनी मानले. यावेळी कंपनीचे सदस्य उमाजी घुंगरे, कल्याण सिराळ, नंदकुमार सोनटक्के, बाळासाहेब राऊत, महादेव राऊत, अर्जुन कणे, गंगाराम डोळसे, शंकर शिराळ यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT