urea
urea  
मुख्य बातम्या

डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा काळाबाजार?

टीम अॅग्रोवन

मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार काळाबाजार सुरु असून याकडे पालघर जिल्हा कृषी विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. युरिया माफियांचे मुख्य केंद्र वाणगाव येथील वाड्या असल्याचे समोर आले आहे. खते विक्रेते व्यापारी, कृषी सेवा केंद्राचे मोठे व्यापारी संगनमताने युरियाचा काळाबाजार करीत असून बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना लाखो टन अनुदानित युरिया विकला जात असल्याचे बोलले जाते. याला स्थानिक राजकीय अभय मिळत असल्याची चर्चा आहे. वाणगाव, डहाणू, वाडा व इतर ठिकाणच्या मोठ्या कृषी केंद्रांच्या व्यापाऱ्यांकडून हा युरिया चारोटी, डहाणू मार्गे वाणगाव, दाभले, साखरे, बाडापोखरण येथे अनुदानित युरियाची सरकारी गोणी बदलून तो युरिया दुसऱ्या गोणीमध्ये भरुन खोट्या दस्ताऐवजच्या साह्याने  वाणगाव, पाचमार्ग, बोईसरमार्गे कारखान्यांना पुरवला जातो. खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी कृषी विभागात प्राप्त झाल्या होत्या.  बोईसरमधील औद्योगिक कारखान्यांना काळ्या बाजारात बाराशे रुपये पेक्षा जास्त किमतीला हा अनुदानित युरियाची विक्री केली जाते. पालघर जिल्ह्यामध्ये अनुदानित युरिया घोटाळ्याकडे लक्ष वेधून सुद्धा पालघर कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करुन कठोर कारवाई करत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा या अवैध धंद्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया युरियाच्या काळ्या बाजाराबाबत कृषी विभागामध्ये शेतकरी व सामान्य नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेऊन संबंधित अवैध युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. जर साठा शिल्लक असेल आणि कृषी केंद्रे शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करत नसतील तर त्यांनी तत्काळ कृषी अधीक्षक पालघर अथवा तालुका कृषी कार्यालयात तक्रार द्यावी. अशा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. - के.बी. तरकसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT