शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे
शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे

टीम अॅग्रोवन

सेनगाव, जि. हिंगोली : तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, संबंधित यंत्रणांकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास दिरंगाई करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ताकतोडा (ता. सेनगाव) येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये काळे झेंडे लावून निषेध केला.

ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन, कापूस, झेंडू आदी पिकांचे खूप नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतरही महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी पंचनामे करण्यास आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांमध्ये काळे झेंडे लावून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला. 

नामदेव पतंगे, दशरथ सावके, कैलास सावके, गणेश सावके, राजेश सावके आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT