शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन करेल 
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन करेल  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन करेल 

टीम अॅग्रोवन

अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच वेगवेगळ्या विषयांवर त्रास होता कामा नये. यासाठी शेतकऱ्याला सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची दखल महसूल विभागाने घ्यावी. शेतकऱ्यांना त्रास झाला तर भाजप सहा जूननंतर आंदोलन पुकारेल, असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.  अकोला तहसील कार्यालयात भाजप व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तहसीलदारांसोबत चर्चा केली. मॉन्सूनचे आगमन होऊन खरीप पिकाची पेरणी होणार आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे, पीक कर्ज, ७/१२, हक्क नोंदणी, फेरफार व शेतकऱ्यांना लागणारे सर्व कागदपत्रांसाठी सहकार्य करून शेतकऱ्यांना कोरोना विषाणूच्या सावटात सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये. अकोला तालुक्यात १५०० शेतकऱ्यांच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे का जमा झाले नाही, असा प्रश्न करून ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा व्हावी व शेतकऱ्याला सर्व परीने मदत करण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज करावी अशा सूचना तहसीलदार विजय लोखंडे व महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्यात.  यावेळी अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे, राजेश बेले, देवेंद्र देवर, चंद्रशेखर खडसे, मंगेश सावरकर, भरत काळमेघ, रणजीत खेडकर, ज्ञानेश्वर कडू आदींची उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT