पाठिंब्यासाठी भाजपचे शिवसेना पक्षप्रमुखांना साकडे
पाठिंब्यासाठी भाजपचे शिवसेना पक्षप्रमुखांना साकडे 
मुख्य बातम्या

पाठिंब्यासाठी भाजपचे शिवसेना पक्षप्रमुखांना साकडे

टीम अॅग्रोवन
मुंबई, प्रतिनिधी : येत्या ७ डिसेंबरला होणारी विधान परिषदेची पोटनिवडणूक आणि संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (ता. २३) मातोश्रीवर भेट घेतली. या वेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.
 
येत्या ७ डिसेंबर रोजी विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी महसूलमंत्री पाटील आणि शिक्षणमंत्री तावडे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातल्याची चर्चा आहे.
 
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे विधान परिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपने अन्य उमेदवार दिल्यास शिवसेना या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते. त्यामुळे अन्य पक्षाची मदत न घेता भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो. म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरू झाल्या आहेत.
 
या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेचा राणेंच्या उमेदवारीला प्रचंड विरोध आहे, त्यामुळे भाजपने उमेदवार दिल्यास शिवसेनेच्या पाठिंब्याने सहज विजय मिळू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT