अचलपुर येथून निर्यात झालेली कारली
अचलपुर येथून निर्यात झालेली कारली 
मुख्य बातम्या

अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या बाजारात

टीम अॅग्रोवन

अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत, उत्पादित कारल्याची थेट आखाती देशात निर्यात करण्यात आली. इच्छा तिथे मार्ग असतो, हे रितेश पोटे या युवा शेतकऱ्याने आपल्या कृतिशिलतेतून सिद्ध केले. त्यांच्या प्रयोगशीलतेचे अनुकरण करून इतरांनी आर्थिक उत्कर्ष साधावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी केले.

अचलपूर येथील प्रयोगशील शेतकरी रितेश पोटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावरील शेतीत व्यवसायिक पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. १० ते १५ एकरावर ते कारली लागवड करतात. अशाप्रकारच्या शेतीपद्धतीत जोखीम असली तरी मागणी असली तर एकाचवेळी मोठा फायदा अशाप्रकारची पीकपद्धती मिळवून देते, असा त्यांचा गेल्या काही वर्षातील अनुभव आहे.

त्यामुळेच यावर्षी त्यांनी पंधरा एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली. मल्‍चिंगवर बियाणे लागवड करण्यात आली. अवघ्या दीड ते पावणेदोन महिन्यात कारली तोडणीस आली आहेत. कारल्यासाठी दुबई येथे निर्यातीचा करार करण्यात आला. तोडणीनंतर कारल्याची पहिली खेप दुबईकडे रवाना झाली. अमरावती विभागीय आयुक्‍त पियुष सिंह  या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT