किसान सभेतर्फे दिंडोरी तहसीलसमोर बिऱ्हाड मोर्चा
किसान सभेतर्फे दिंडोरी तहसीलसमोर बिऱ्हाड मोर्चा  
मुख्य बातम्या

किसान सभेतर्फे दिंडोरी तहसीलसमोर बिऱ्हाड मोर्चा

टीम अॅग्रोवन

नाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवीन व विभक्त रेशनकार्ड देण्यात आलेले नाही. तसेच वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील समोर सोमवार (ता. २४) बिऱ्हाड मोर्चा सुरू केले आहे. यामध्ये तालुक्यातील शेतकरी, आदिवासी सहभागी झाले आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत तहसील कार्यालयात बैठक बोलावली. या वेळी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक निर्णयावर ठाम आहेत.  या आहेत प्रमुख मागण्या 

  • वनाधिकारी कायद्यानुसार कलम १९ मध्ये सुचविलेल्या पुराव्यातील दाव्यासोबत दोन पुरावे सादर केलेल्या दावेदारांचे दावे मंजूर करा.
  • मंजूर दावेदारांच्या ताब्यातील ४ हेक्टरपर्यंतची मंजूर करून सातबारा सदरी नोंद करा.
  • गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.
  • वणी, ननाशी, करंजाळी येथे वन विभागाचा मनमानी कारभार थांबवा.
  • पेन्शन लागू करताना जाचक अटी रद्द करा. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT