भूतान येथील थिम्पा बाजारपेठेमध्ये भाजीपाला विक्री करीत असलेली महिला.
भूतान येथील थिम्पा बाजारपेठेमध्ये भाजीपाला विक्री करीत असलेली महिला. 
मुख्य बातम्या

भाजीपाल्यामध्ये स्वयंपूर्णता गाठण्यासाठी भूतानचे प्रयत्न

वृत्तसेवा

भूतान हा देश संपूर्ण सेंद्रिय उत्पादनासाठी ओळखला जात असला तरी भाजीपाल्यासाठी या देशांला काही प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भूतान शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. भाजीपाला उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता आणण्यासाठी १२ व्या नियोजनाच्या अंती देशामध्ये किमान ६५१६२ टन भाजीपाल्याचे उत्पादन होण्याची गरज आहे. २०१४, २०१५ आणि २०१६ या तीन वर्षांमध्ये सरासरी ५९५८ टन भाजीपाल्याची निर्यात झाली असली तरी आयातीचे प्रमाणे १४,३५४ टनापर्यंत पोचले होते. एकूण स्थितीविषयी माहिती देताना राष्ट्रीय भाजीपाला समन्वयक किन्ले टशेरींस म्हणाले की, ११ व्या नियोजनाच्या सुरवातील भाजीपाल्यातील स्वयंपूर्णता ही ८३.१२ टक्के इतकी होती. ती वाढून आता ८६.१३ टक्के झाली आहे. १२ नियोजनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत ही टक्केवारी १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. म्हणजेच भाजीपाला उत्पादन सध्याच्या ५२११४ टनांपासून वाढून ६५१६२ टनांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. ११ व्या नियोजनाच्या सुरवातीला देशाची भाजीपाला निर्यात २७२१ टन (किंमत ६३० युरो) होती. ती वाढून २०१६ मध्ये ८२४२ टन (किंमत २०.४ लाख युरो) पर्यंत पोचली. सांख्यिकी भाषेमध्ये ही निर्यातीतील वाढ सुमारे ८८ टक्के होते. सध्या भारतातून आयात होत असलेल्या भाज्यामध्ये टोमॅटो आणि कांदा मुख्य आहेत. भूतान येथील कृषी मंत्रालयामार्फत भूतान येथील सर्व जिल्ह्यामध्ये भाजीपाला उत्पादनासाठी लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या पारंपरिक पिकाकडून भाजीपाला उत्पादनाकडे वळविण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या ऑगस्टपासून भुतानच्या दक्षिणेकडील आठ जिल्ह्यांमध्ये अधिक प्रयत्न केले जात आहेत. या भाज्यांना प्राधान्य ः ११ व्या नियोजनामध्ये टर्निप्स (लाल मुळा), ब्रोकोली, वांगी, लसूण, कांदा पात, टोमॅटो, मिरची, काकडी, भोपळा, गाजरे या भाज्यांना प्राधान्य दिले होते. पुढे १२ व्या नियोजनामध्ये यात भेंडी आणि स्कॅश यांची भर पडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT