भिरा ठरले जगात सर्वांत उष्ण ठिकाण
भिरा ठरले जगात सर्वांत उष्ण ठिकाण 
मुख्य बातम्या

भिरा ठरले जगात सर्वांत उष्ण ठिकाण

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकणातील भिरा येथे यंदाच्या हंगामातील ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २९ मार्च रोजी भिरा येथे मार्च महिन्यातील सर्वकालीन उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदाही मार्च महिन्यात पारा पुन्हा ४५ अंशांवर पोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा जगातील सर्वात उष्ण शहर ठरले असल्याचे जागतिक हवामानाची माहिती देणाऱ्या ‘अल डोरॅडो’ या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे.  ‘अल डोरॅडो’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार जगातील सर्वांत उष्ण पंधरा ठिकाणांमध्ये देशातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील भिरा पहिल्या स्थानावर, तर गुजरातमधील पाेरबंदर (४२.५ अंश) व सुरत (४१.८) अनुक्रमे आठव्या व पंधराव्या स्थानावर आहे. या जागतिक हवामानाची माहिती देणाऱ्या या संकेतस्थळावर २४ तासांमधील जगातील उष्ण, थंड ठिकाणांसह सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांचीही माहिती देण्यात येते. सध्या अंटार्टिका सर्वांत थंड ठरत असून, तेथे किमान तापमान उणे ५९.८ अंशांपर्यंत कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.  राज्यभर उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत भिरापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांवर गेले आहे. भिरासह मुंबई आणि अलिबाग येथे उष्णतेची तीव्र लाट आल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शनिवारपर्यंत (ता. ३१) राज्यात हवामान कोरडे राहणार असून, तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.    मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, नगर ४१.१, जळगाव ४०.४, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.२, नाशिक ३८.१, सांगली ३९.२, सातारा ३८.१, सोलापूर ३९.९, मुंबई (सांताक्रूझ) ३८.७, अलिबाग ३५.५, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३४.०, भिरा ४५.०, औरंगाबाद ३८.३, परभणी ४०.४, अकोला ४०.७, अमरावती ३९.८, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ४०.२, गोंदिया ३७.०, नागपूर ३९.४, वर्धा ४०.०, यवतमाळ ३९.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT