कृषी योजनांचा लाभ सुलभ व्हावा : रविशंकर नटराजन
कृषी योजनांचा लाभ सुलभ व्हावा : रविशंकर नटराजन  
मुख्य बातम्या

कृषी योजनांचा लाभ सुलभ व्हावा : रविशंकर नटराजन

टीम अॅग्रोवन

जालना  : ‘‘संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, कृषिविषयक योजनांचा लाभ अधिक सुलभ व सहजतेने कसा मिळेल ते पाहिले पाहिजे. फळबागांसाठी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, शेततळे शेतकऱ्यांना सहज मिळावे,’’ अशी अपेक्षा जागतिक बॅंकेचे सल्लागार रविशंकर नटराजन यांनी व्यक्त केली. 

नटराजन यांनी रविवारी (ता. २५) ॲग्रो इंडिया गटशेती संघांतर्गत जाफ्राबाद तालुक्‍यातील डोणगाव, पोखरी, देळेगव्हान, अकोला देव, भातोडी, नांदखेडा आदी ठिकाणी शेतीपूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसह कपाशी, मिरची, शेडनेट शेती, डाळिंब, अतिघन पद्धतीने आंबा लागवड, द्राक्ष, शेडनेटमधील बीजोत्पादन, शेततळे आदींची पाहणी केली. 

जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींनी नुकताच ॲग्रो इंडिया गटशेती संघांतर्गत गटशेतीमध्ये काम करणाऱ्या डोणगाव येथे अमोल अंभोरे व रशीद मनियार, पोखरी येथे विठ्ठल पाचरणे, देळेगव्हान येथे गोविंदराव पंडीत, भगवान कापसे, बाळू कापसे, संतोष बोर्डे, अकोला देव येथे लक्ष्मण सवडे, भाऊराव दरेकर, भातोडी येथे रामेश्‍वर गायके, नांदखेडा येथे शरद सवडे, रतन पवार आदी शेतकऱ्यांशी नटराजन यांनी संवाद साधला.

संघाचे प्रमुख डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, ‘‘औरंगाबादेत एअर कार्गोची सोय होणे आवश्‍यक आहे. ठिबकला ८० टक्‍के अनुदान व स्थानिक मार्केट डेव्हलपमेंटसाठी उपाययोजनांची गरज व्यक्‍त केली. योजनांचा लाभ परावर्तित होण्यासाठी नेमके काय  करता येईल, या विषयी मुख्यंमंत्र्यांकडे केलेल्या सादरीकरणाची माहिती नटराजन यांना दिली.’’    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT