विहिर खोदकाम
विहिर खोदकाम 
मुख्य बातम्या

विहीर खोदाई अनुदानासाठी शेतकरी निवड अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

पुणे  : विहीर खोदाईकरिता अडीच लाखांचे अनुदान देण्यासाठी शेतकरी निवडण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातून ५३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शेतकऱ्यांसाठी विहीर खोदाईच्या अनुदानात यंदा कृषी खात्याने दीड लाख रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय आधीच्या कामकाजात होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाइन अर्ज पद्धत आणून पारदर्शकता आणण्याचा चांगला पायंडा पाडला आहे.  ‘‘या योजनेतून यंदा प्रथमच प्रतिशेतकरी अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. मार्चअखेरपर्यंत १८७ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटले जाईल,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  विहीर खोदाई अनुदान योजनेत अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना आता कार्यारंभ आदेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निवड समितीची मंजुरी अत्यावश्यक आहे. ‘‘ऑनलाइन अर्ज आता निवड समितीकडे जातील. राज्यातील निवड समित्यांकडून पुढील काही दिवसात अंतिम निवड यादी निश्चित केली जाईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  ‘‘समित्यांची मान्यता मिळताच शेतकऱ्यांना अनुदानासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी खात्यामार्फत पाठविले जाणार आहे. कार्यारंभ पत्र हाती येताच ३० दिवसांत विहीर खोदाईला सुरवात करावी लागेल. विहीर खोदाईची कामे ३१ मार्चअखेर पूर्ण करावी लागतील. मात्र, काम जसे पूर्ण होईल त्याप्रमाणात अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील,’’ असेही कृषी विभागातून सांगण्यात आले.  अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये 

  • पंचायत समित्यांकडून होणारी वशिलेबाजी थांबविण्यासाठी यंदा राज्यभर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. 
  • ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५३ हजार शेतकऱ्यांनी भरले अर्ज 
  • अनुसूचित जातीच्या ४८२३ शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून आणि अनुसूचित जमातीच्या ३५६७ शेतकऱ्यांना सुधारित आदिवासी योजनेतून विहीर खोदाईसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार 
  • विहिरीसाठी अडीच लाख रुपये मिळतीलच याशिवाय वीज कनेक्शन, वीज पंप, ठिबक किंवा तुषार संचासाठी असे एकूण तीन लाख ३५ हजार रुपये मिळतील.  
  • आधीची विहीर असल्यास दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये मिळतील. याशिवाय वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये मिळणार 
  •  विहीर नको असल्यास पण मागेल त्याला शेततळे योजनेतून तळ्याची खोदाई केलेली असल्यास प्लास्टिक पेपरसाठी एक लाखाचे अनुदान मिळेल. तसेच वीज कनेक्शनला दहा हजार, वीज पंप २५ हजार, ठिबक संचाला ५० हजार रुपये दिले जातील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

    Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

    Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

    Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

    SCROLL FOR NEXT