खाद्यतेल
खाद्यतेल  
मुख्य बातम्या

खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः सरकारने रिफाइंड, ब्लिच्ड आणि शुद्ध पामतेलाचे (आरबीडी) किमान आयात मूल्य सोडून बाकी सर्व खाद्यतेलांच्या किमान आयात मूल्यात वाढ केली आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी (ता. १५) प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून मिळाली आहे. तेलबिया उत्पादन कमी होत असल्याने भारत हा मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. जगात तेलबिया उत्पादन घटणार असल्याचा अंदाज नुकताच अमेरिकेच्या कृषी विभागने जाहीर केला आहे. त्यातच देशात तेलबिया पिकांचे दर हमीभावाच्याही खाली गेले आहेत आणि अलीकडेच दोन दिवासांपूर्वी देशातील काही भागांत झालेल्या गारपिटीने तेलबिया पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे देशात आणि जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढतील असा अंदाज बांधून व्यापारी आयात करतील आणि परिणामी देशातील तेलबिया पिकांचे दर पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या बदलत्या किमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यात होणारे बदल यामुळे सरकारने खाद्यतेलांच्या किमान आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सूत्रांनी सांगितले. क्रूड सोयातेलाच्या किमान आयात मूल्यात किंचित वाढ झाली आहे. क्रूड सोयातेलाचे मूल्य प्रतिटनामागे ९ डॉलरने वाढले असून, आता प्रतिटन ८३१ डॉलर मूल्य झाले आहे. तसेच क्रूड पामतेलाच्या किमान आयात मूल्य ६ डॉलरन वाढून ६८१ डॉलर प्रतिटन झाले आहे. तर ‘आरबीडी’ पामतेलाचे मूल्य हे ६८६ डॉलरवरून ६८८ डॉलर करण्यात आले आहे. भारत हा खाद्यतेल आयातदार देश आहे.  २०१६-१७ या वर्षात १५.१ दशलक्ष टन खाद्यतेल आयात झाली होती, तर त्याआधीच्या वर्षी १४.६ दशलक्ष टन आयात होती. डिसेंबर २०१७ मध्ये १.१ दशलक्ष टन आयात झाली होती, अशी माहिती सॉल्व्हेंट एक्ट्राक्टर्स असोसिएशनने दिली आहे. आयात होणाऱ्या खाद्यतेलापैकी जवळपास ८.५ दशलक्ष टन पामतेल होते. त्याची आयात मुख्य करून इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतून होते. सोयातेलाची मुख्य आयात ही अर्जेंटिना देशातून होते. अर्जेंटिना हा जगातील तिसरा सर्वांत मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. असे झाले बदल...

  • क्रूड सोयातेलाचे किमान आयात मूल्य ८२२ डाॅलरवरून वाढून ८३१ डाॅलरपर्यंत वाढविले.
  •  ‘आरबीडी’ पामोलिनच्या किमान आयात मूल्यात ६९५ वरून ६८६ डॉलरपर्यंत वाढ
  • क्रूड पामोलिनचे मूल्य ६९२ डॉलरवरून ६९५ डॉलरवर गेले.
  • ‘आरबीडी’ पामतेलाचे किमान आयात मूल्य ६८८ डॉलरवरून कमी होऊन ६८६ डॉलर झाले आहे. 
  • क्रूड पामोलिनचे मूल्य ६ डॉलरने वाढून ६७५ वरून ६८१ डॉलरवर गेले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT