Banks to lend more crop Give instructions from the state level: Bhujbal
Banks to lend more crop Give instructions from the state level: Bhujbal 
मुख्य बातम्या

जास्त पीक कर्जवाटप करण्यासाठी बँकांना राज्यस्तरावरून सूचना द्या ः भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्हा बँकांची सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीयीकृत बँकांनी जास्तीचा पीक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना करावा, यासाठी तशा सूचना संबंधित बँकांना राज्यस्तरावरून द्याव्या, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार (ता.२१) राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा बैठकीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कॉन्फरंन्स झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने सहभागी झाले होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील अटी शिथिल करून खासगी, शासकीय रोपवाटिका करून शेतकऱ्यांना परवान्यावर कलमे-रोपे घेण्यास परवानगी मिळावी.'मागेल त्याला शेततळे'ही योजना सन २०२०-२१ मध्ये सुरु ठेवून शेतकऱ्यांना प्रती शेततळे रुपये ५० हजार ऐवजी वाढ करून रुपये ७५ हजार अनुदान मिळावे. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत जिल्ह्यातून १ लाख ३७ हजार शेतकरी पात्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ अद्याप मिळालेला नाही, तो त्यांना तात्काळ द्यावा.’’  भुजबळ यांच्या मागण्या 

  • जिल्ह्यातील कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ, सामुहिक शेततळे व संरक्षित शेतीसाठी लक्षांक वाढवा 
  • रेल्वेने कांदा वाहतूक करताना विलंब शुल्क माफ करावे, केंद्र सरकारकडे तशी मागणी करा 
  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्याची नवीन योजना शासनस्तरावरून प्रस्तावित करा 
  • हंगामी द्राक्ष पिकाबाबत कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे. त्यांच्या शिफारशीनुसार फळ पिक विमा योजनेत पुर्वहंगामी द्राक्ष पिकाचा समावेश करावा. 
  • शेतीकामे करणाऱ्या मजुरांचा समावेश म.ग्रा.रो.ह.यो.मध्ये करा 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT