तापमानामुळे केळीच्या बागा सुकल्या
तापमानामुळे केळीच्या बागा सुकल्या 
मुख्य बातम्या

अकोला : तापमानामुळे केळीच्या बागा सुकल्या

टीम अॅग्रोवन

अकोला : रखरखत्या उन्हामुळे फळबागांना या वर्षी सर्वाधिक फटका बसला आहे. अकोटपाठोपाठ आता तेल्हारा तालुक्यातही नुकसानाचे मोठे क्षेत्र असल्याचे समोर आले आहे. रणरणत्या उन्हाचा तडाखा केळी पिकाला सोसवेनासा झाला आहे. यामुळे फळबागा सुकल्या आहेत. काही ठिकाणी बागेतील केळीचे घड काळे पडले आहेत. हवामानावर आधारित विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी चिंतीत शेतकऱ्यांनी केली आहे. 

तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांनी परंपरागत कपाशी पिकाला पर्याय म्हणून केळीची लागवड केली. बेलखेड, गोर्धा, हिवरखेड, कारला, सौंदळा, तळेगाव बाजार, आडगाव, खंडाळा, दानापूर, माळेगाव बाजार या भागातील शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. 

मोठ्या कष्टाने विविध संकटातून केळीचे रक्षण केले. आता मात्र रणरणत्या उन्हामुळे  केळीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. केळीची झाडे जागेवरच सुकून गेली आहेत. काही झाडांवरील घड काळे पडले आहेत. त्यामुळे अनेकांना उत्पादनखर्चही निघण्याची आशा नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वेळोवेळी याबाबत मार्गदर्शन मागितले. पण त्याचाही फारसा फरक पडला नाही. किमान उत्पादनखर्च तरी निघावा यासाठी हवामानावर आधारित विमा काढला आहे, तो मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT