babanrao pachpute
babanrao pachpute 
मुख्य बातम्या

‘कुकडी'च्या पाण्याबाबत बबनराव पाचपुते आक्रमक 

टीम अॅग्रोवन

नगर: श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा ते दीड टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. मात्र, आत्तापर्यंत केवळ पाऊण टीएमसी पाणी मिळाले आहे. हा अन्याय असून, अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत आहे. पाणी द्या नाहीतर जलसंपदाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे. 

कर्जत-करमाळा येथील भरणे करताना मुबलक पाणी गेले. आता उद्या पारनेरचेसुद्धा भरणे होतील. श्रीगोंद्यातील शेती जाळण्याचे पाप अधिकारी करतात. हा अन्याय मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, म्हणून आहे का, असा सवाल करीत पाचपुते म्हणाले, की सद्यःस्थितीत पाणी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे अजूनही त्यांनी गांभीर्याने घेऊन श्रीगोंद्याला पाणी मिळवून द्यावे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. मर्यादेचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. श्रीगोंद्याचे सिंचन पूर्ण होण्यासाठी अजून हक्काचे अर्धा टीएमसी पाणी द्यावे. 

कालवा सल्लागार समितीची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झाली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी ठरविले असते, तर व्हिडिओ कॉन्फरन्सवर घेता आली असती. अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता, की श्रीगोंद्याला हक्काचे पाणी देऊ. पण पाणी कमी येतेय असे लक्षात आल्यावर आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्या वेळी मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पाठपुरावा केल्याचे दिसून येत नसल्यामुळे श्रीगोंदे वंचित राहत आहे. वेळ आली, तर या पाणीप्रश्नाबाबत विधानसभेतही आवाज उठवू. आमदार कोणत्या पक्षाचा हे न पाहता शेतकरी केंद्रबिंदू मानून पाणी दिले पाहिजे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT