केळी
केळी  
मुख्य बातम्या

केळीला चार महिन्यांपासून चांगला दर

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मागील चार महिन्यांपासून केळीचे बऱ्यापैकी दर मिळत असून, गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे निर्यातीलाही चालना मिळाली आहे. मागील चार महिने चांगल्या दर्जाच्या केळीला एक हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. उत्तरेकडील राज्यांमधून मागणी कायम असल्याने होळी व रंगाचा उत्सव असतानाही सावदा व चोपडा येथे केळीची खरेदी सुरूच आहे.  होळी किंवा धूलिवंदनाचा उत्साह उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक असतो. या काळात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू येथून केळीची मागणी नसते. सावदा, चोपडा व पाचोरा भागांतील केळी खरेदीदारांना चार-पाच दिवस व्यवहार बंद ठेवावे लागत होते. परंतु यंदा मात्र अनेक वर्षांनंतर होळीच्या काळातही सावदा (ता. रावेर) व चोपडा येथील केळी व्यापाऱ्यांना केळीची कापणी व इतर व्यवहार सुरू ठेवावे लागले.  केळी निर्यात देशांतर्गत बाजारपेठे मागील चार महिने कायम राहिली आहे. सावदा येथून जानेवारी व फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल केळीची निर्यात उत्तरेकडील राज्यांमध्ये झाली. काही व्यापाऱ्यांना पश्‍चिम बंगाल व बिहारपर्यंत केळी पाठविण्याच्या ऑर्डरही मिळाल्या होत्या. सध्या आगाप नवती, पिलबाग यांची रावेर, चोपडा, पाचोरा, जामनेर भागांत कापणी सुरू झाली आहे. जळगाव व यावलमधील कांदेबाग संपत आले असून, दर्जेदार केळीचा पुरवठा कमी झाला आहे. परंतु आगाप नवती रावेरातून सुरू झाल्याने तुटवड्याची समस्या मागील १० ते १२ दिवसांत दूर होण्यास मदत झाली आहे. केळी खरेदी जोरात रावेरनजीकच्या बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापाऱ्यांनी ऑन देऊन मुक्ताईनगर तालुक्‍यातील कर्की, दुई, अंतुर्ली, चांगदेव आदी तापीकाठालगतच्या भागातून केळीची खरेदी सुरूच ठेवली असून, सावदा व चोपडा, पाचोरा भागांतील व्यापाऱ्यांसमोर स्पर्धाही वाढली आहे. केळीचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी सावदा येथे भेट देऊन मध्यस्थांना आगाऊ रक्कम वितरणासाठी मदत केल्याची माहिती मिळाली. चोपडा येथील सुमारे १२ केळी व्यापाऱ्यांकडून शिरपूर, शिंदखेडा (जि. धुळे) भागातूनही केळीची खरेदी सुरू झाली आहे. सध्या मुबलक व अधिक गुणवत्तापूर्ण केळी रावेर, यावल व चोपडा भागात अधिक आहे. पाचोरा तालुक्‍यातही चांगली केळी असून, व्यापाऱ्यांनी केळी उत्पादकांकडे आगाऊ नोंदणीही करून ठेवली आहे, असे सांगण्यात आले.  प्रतिक्रिया यंदा केळीचे दर पाच सहा महिने स्थिर आहेत. पाच सहा वर्षांपूर्वी १४०० रुपयांपर्यंत दर गेले होते. पण त्यात मोठी घसरणही झाली होती. मागील पाच-सहा महिने असे काहीच झाले नाही. स्थिर दरांचा लाभ केळी उत्पादकांना चांगला होत आहे. जळगाव जिल्ह्यात एक हजार रुपये प्रतिक्विंटल व ऑन, असे चांगले दर मिळत आहेत. बऱ्हाणपूरचे दर काही वेळेस १२०० रुपयांवर असतात.  - विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर (ता. रावेर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT