On average 80 percent water in Kolhapur
On average 80 percent water in Kolhapur 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात सरासरी ८० टक्के पाणी

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणसाठे समाधानकारक पातळीवर आहेत. धरणांमध्ये सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे.

महापूर, अतिवृष्टीमुळे गत हंगामात सातत्याने बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत राहिला. नोव्हेंबरपासून पिकांना पाण्याची गरज भासू लागली. परंतु, स्थानिक पाणीसाठ्यात वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिकांच्या साह्याने शेतीची पाण्याची गरज भागविण्याचा प्रयत्न केला. यामुळे गेल्या तीन महिन्यांतील धरणांतील पाण्याची मागणी कमी राहिली.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत राधानगरी, वारणा, दुधगंगा आदी मोठ्या धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. या धरणांतून गेल्या दोन महिन्यांत केवळ २० ते २२ टक्के पाण्याचा वापर झाला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्‍यांनी अधिक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत टंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे. राधानगरी धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्के पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांबरोबर लहान व मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याचा उपसा कमी होत आहे. 

डिसेंबर, जानेवारीमध्ये काहीसे ढगाळ व थंडी असे संमिश्र हवामान असल्याने पाण्याची मागणी कमी राहिली. याचा परिणाम पाणीसाठे कमी न होण्यावर झाला. फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून उन्हाच्या तडाख्याची शक्‍यता गृहीत धरता पाण्याची मागणी एप्रिल, मेपर्यंत सातत्याने वाढत राहील, अशी शक्‍यता आहे. यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे.

अजून उपसाबंदीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. मार्चनंतर पाण्याची मागणी पाहून याबाबतचे नियोजन करण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ऊस हंगाम पूर्ण झाल्यानंतर नव्या लागवडी तातडीने झाल्यास येत्या दोन महिन्यांत पाण्याची गरज भासेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT