बोंड अळीचा प्रादुर्भाव १४ गावांत नुकसान पातळीवर
बोंड अळीचा प्रादुर्भाव १४ गावांत नुकसान पातळीवर 
मुख्य बातम्या

अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४ गावांत नुकसान पातळीवर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासून दिसून आला आहे. इतरत्र अजून बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडली नसली तरी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुक्‍यातील १४ गावांत मात्र कपाशीवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडल्याच्या कृषी विभागाच्या पीक परिस्थिती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १४ जूनपूर्वी लागवड झालेल्या ओलिताखालील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर दिसून आल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यातील लोणी खुर्द महसूल मंडळातील नायगव्हाण, शिवूर महसूल मंडळात बिरोळा, वळण व कविटखेडा या गावातील पिकांची स्थिती आता पाऊस आला तरी सुधारण्याची स्थिती नाही. वैजापूर तालुक्‍यातील २४ गावांमध्ये कमी पावसामुळे बाजरी ६८१ हेक्‍टर, मका २२९६ हेक्‍टर, मूग २४२५ हेक्‍टर, तूर १७८ हेक्‍टर, भुईमूग १४४ हेक्‍टर, उडीद ३२ हेक्‍टर तर कपाशी ६०२५ हेक्‍टर असे एकूण ९५६५ हेक्‍टरी खरिपाचे पीक बाधीत झाले आहे. पैठण तालुक्‍यातील चार महसूल मंडळातील अकरा गावांतील ६८६ हेक्‍टर क्षेत्र कमी पावसामुळे बाधित होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

गंगापूर तालुक्‍यातील १२ हजार ९३० हेक्‍टरवरील तर कन्नड तालुक्‍यातील १३६२ हेक्‍टर क्षेत्र कमी पावसामुळे बाधित होण्याची शक्‍यता वर्तविली गेली आहे. बीड जिल्ह्यातील १८ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान पावसाच्या खंडामुळे पिकाची वाढ खुंटली होती. १६ ऑगस्टला पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले तरी पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यता जास्त आहे.

मराठवाड्यातील पीकनिहाय स्थिती (स्राेत ः कृषी विभाग) मका : पावसामुळे मकाची स्थिती सुधारण्याची शक्‍यता मात्र काही ठिकाणी खोडकीड व पोंगेमरचा प्रादुर्भाव कपाशी : १४ जूनअगोदर लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावर नुकसान पातळीवर तूर : पावसामुळे तूर पिकाला मिळाले जीवनदान, जालना जिल्ह्यात उत्पादकतेवर परिणामाची शक्‍यता मूग : खंडाने वाढ खुंटली, मावा किडीं, भुरीचा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव उडीद : पावसाच्या खंडाने वाढीवर परिणाम, मावा, पाने खाणाऱ्या अळीचाही प्रादूर्भाव सोयाबीन : रस शोषण करणाऱ्या किडी, उंट अळी, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बाजरी : वाढीच्या अवस्थेतील पिकाला पावसामुळे जीवदान.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT