पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी
पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी 
मुख्य बातम्या

पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी

टीम अॅग्रोवन

वाशीम : येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या वाशीम जिल्हा परिषद, तसेच जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला अमरावती विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. आता सोमवारी (ता. २७) गट व गणांची आरक्षण सोडत काढली जाणार असून, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

मुदत संपल्याने येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूप मतदारसंघ रचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.  डिसेंबर महिन्यात विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. ही निवडणूक सन २०११ च्या जनगणनेच्या अनुषंगाने होत असून, वाशीम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला आहे. पूर्वीच्या नऊ मतदारसंघांपैकी एक आणि दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे.  काही जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे कायम असून, दहावा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला. 

लोकसंख्या व चक्रानुक्रमानुसार एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव प्रशासनाने १० आॅगस्टला अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला नुकतीच विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT