Appoint contract staff in healthcare: MP Gawli
Appoint contract staff in healthcare: MP Gawli 
मुख्य बातम्या

आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचारी नियुक्‍त करा ः खासदार गवळी

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असण्याची गरज आहे. त्याकरिता कंत्राटी पद्धतीने रिक्‍तपदे भरावी, अशी सूचना खासदार भावना गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. उपचाराअंती ते निगेटीव्ह झाले, ही बाब दिलासादायक ठरली आहे. परंतु येत्या काळात अशाप्रकारच्या आवाहनाचा सामना करावा लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाखांवर आहे. 

पुणे, मुंबई येथून आठ ते दहा हजार विद्यार्थी तसेच मजूर जिल्ह्यात परतले. त्यांच्यामध्ये कोरोनाबाधित असण्याची शक्‍यता असल्याने त्यांची तपासणी गरजेची आहे. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर या कामाचा अतिरिक्‍त ताण येऊ शकतो. आरोग्य यंत्रणेचे काम यामुळे प्रभावीत होण्याची शक्‍यता देखील आहे. त्यामुळे उपचारासाठी तयार राहण्याच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी, अशी सूचना खासदार गवळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये रोज जवळपास दोन हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. असे असताना या ठिकाणी फक्‍त सात फार्मसिस्ट आहेत. तीन व्यक्‍ती औषध भांडावर वर नियुक्‍त आहेत. फक्‍त चार फार्मसिस्ट रुग्णांना औषधी देतात. प्रत्येक रुग्णाला औषध घेण्याची वेळ तसेच डोस सांगावा लागतो. पारिचारिका तसेच इतर कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT