Appeal to apply for ‘Animal Husbandry’ schemes
Appeal to apply for ‘Animal Husbandry’ schemes 
मुख्य बातम्या

‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

टीम अॅग्रोवन

पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना सुरू झाल्या आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी ४ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे,  शेळी-मेंढी  गट वाटप, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी शेड उभारणीस अर्थसाह्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप, २५+३ तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे किंवा गुगल प्ले-स्टोअरवर एएच-महाबीएमएस हे ॲन्ड्रॉइड मोबाइल ॲप उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील.

वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी व शासनाकडे एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दर वर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील ५ वर्षांसाठी लागू ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालाय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT