अनुपम कश्यप
अनुपम कश्यप  
मुख्य बातम्या

राज्यात शुक्रवारनंतर पुन्हा चांगला पाऊसः डॉ. अनुपम कश्यपी

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सून हंगामात एका टप्प्यात चांगल्या पावसानंतर काही काळ खंड पडतो. त्यानुसार सध्या राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र प्रशांत महासागरातील कमकुवत झालेली एलनिनो स्थिती, मॉन्सूनसाठी बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली पोषक स्थिती यामुळे शुक्रवारनंतर (ता. १९) राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत, अशी माहिती पुणे केंद्राचे हवामान अंदाज प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.   डॉ. कश्यपी म्हणाले, प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती अतिशय कमजोर असून, तिचा मॉन्सूनवर कोणताही प्रभाव नाही. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कोणतीही नकारात्मक स्थिती नाही. चांगल्या पावसानंतर मॉन्सूनही काहीसा कमजोर झाला आहे. मॉन्सूनने अद्यापही संपूर्ण देश व्यापला नसून, राजस्थानसह वायव्य भारतात मॉन्सून पोचलेला नाही. मॉन्सून हंगामात उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) सक्रीय असतो. दक्षिण उत्तरेकडे साकरत असणाऱ्या या पट्ट्यामुळे पावसाचा जोरही कमी अधिक होत असतो.   सध्या या पट्ट्याचा पंजाब, हरियाणा दरम्यान असलेला भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर पूर्व भाग बंगाल आणि नागलॅंड दरम्यान आहे. त्यामुळे पूर्व भारतातील राज्य आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. तर पश्चिम राज्ये आणि वायव्य भारतात पावसाने उघडीप दिली आहे. मॉन्सून सक्रीय नसल्याने कोकण, घाटमाथा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसात खंड राहील. हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील जवळपास आठवडाभर पावसाची उघडीप राहणार आहे. १८ जुलै च्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार हेण्याचे संकेत आहेत. त्यामुळे १९ ते २५ जुलै दरम्यान देशात मॉन्सून सक्रीय होणार असून, महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT