The announcement of the Orange Processing Project raised hopes
The announcement of the Orange Processing Project raised hopes 
मुख्य बातम्या

संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या घोषणेमुळे आशा पल्लवीत

Vinod Ingole

नागपूर ः मोर्शी तालुक्‍यात नव्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्यानंतर संत्रा उत्पादकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. या माध्यमातून संत्रा उत्पादकांना न्याय मिळेल, अशी भावना विदर्भातील संत्रा उत्पादकांमधून व्यक्‍त होत असताना अनेक घोषणांपैकी ही देखील एक घोषणा तर ठरणार नाही, अशी भीती देखील दुसऱ्या बाजूने व्यक्‍त होत आहे.

महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या घोषणेमागे ॲग्रोवनचा पाठपुरावा हे देखील एक कारण नोंदविले आहे. राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी (ता. ८) जाहीर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोर्शी तालुक्‍यात संत्रा प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. यापूर्वी ठाणाठुणी (मोर्शी, अमरावती) येथे जैन आणि कोकाकोला यांच्या संयुक्‍त भागीदारीतून २९ डिसेंबर २०१७ मध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. परंतु हा प्रकल्प आजवर कार्यान्वित होऊ शकला नाही. काटोल येथील मल्टीलाईन प्रकल्पाची चाके गेल्या २५ वर्षात हालली नाहीत.

आमदार भुयार यांचे प्रयत्न फळास वरुड, मोर्शी तालुक्‍यात ६५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारावा याकरिता आमदार देवेंद्र भुयार सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. चार दिवसांपूर्वीच त्यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. ॲग्रोवनमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित संत्रा प्रश्‍नांची पाच भागाची मालिका त्यांनी अभ्यासली. त्याच आधारे त्यांनी संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न उपमुख्यमंत्र्यांसमोर रेटले. आता थेट प्रकल्पाची घोषणा झाल्याने संत्रा उत्पादकांना न्याय मिळाला आहे.

एकूण संत्रा उत्पादनाच्या ४० टक्‍के फळे ही छोट्या आकाराची (टूल्ली) असतात. त्यावर प्रक्रिया झाल्यास संत्र्याचे दर कधीच खाली येणार नाहीत. हा भाग खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम् होईल. त्यासाठी राज्य सरकारने केलेली प्रक्रिया उद्योगाची घोषणा निश्चितच नवा आशावाद ठरणारी आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT