Animal market, race banned in Solapur district
Animal market, race banned in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात जनावर बाजार, शर्यतीस मनाई

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘‘‘लंम्पी स्कीन या रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या जनावरांचे बाजार भरविणे, शर्यती लावणे, प्रदर्शन भरविणे, प्राण्यांचे गट करून कोणतेही काम पार पाडणे, यास सक्त मनाई करण्यात आली आहे’’, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त ना. अ. सोनवणे यांनी दिली.

‘लम्पी स्कीन हा आजार गाय, म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावराच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी होतात. या रोगाचा प्रसार डास, माश्या, गोचीड इत्यादीमुळे होतो. बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास हा आजार होतो. मात्र जनावरांपासून मानवास हा आजार होत नाही. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावी. या रोगामध्ये दोन-तीन दिवस ताप राहतो.

बाधित जनावराला भूक कमी लागते, दूध कमी देते, अशक्त होते. ही लक्षणे दिसून येतात. उपचाराने जनावरे बरी होतात. 

सर्व बाधित जनावरांना लसीकरण करून रोगाचा प्रसार थांबविता येतो. जिल्ह्यामध्ये गोजातीय प्रजातीमधील इतर प्राणी पाळल्या जाणाऱ्या ठिकाणापासून कोणत्याही ठिकाणी ने-आणण्यास तसेच बाधित झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत, अन्य साहित्य अशा प्राण्यांचे शव, कातडी नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे, असेही सोनवणे यांनी सांगिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT