Animal Husbandry Committee should be set up in each district
Animal Husbandry Committee should be set up in each district 
मुख्य बातम्या

प्रत्येक जिल्ह्यात पशुकल्याण समिती स्थापन करावी : डॉ. नितीन मार्कंडेय

टीम अॅग्रोवन

परभणी ः घोडे, खेचर, गाढव या अश्ववर्गीय प्राण्यांच्या संख्येत होत असलेली घट ही बाब चिंताजनक आहे. या समाज उपयोगी परंतु, अलीकडील काळात दुर्लक्षित होत चाललेल्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पशुकल्याण समिती स्थापन करावी. या अश्ववर्गीय प्राण्यांना विमा संरक्षणासाठी मायक्रोचिपद्वारे ओळख क्रमांक देण्यात यावेत आदी शिफारशी परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित या विशेष राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी तज्ज्ञ, अभ्यासक, संवर्धक यांनी केल्या अशी माहिती सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी दिली.

पशुधनाचा अविभाज्य घटक असणारे घोडे, खेचर, गाढव यांसारखे अश्ववर्गीय प्राण्याची संख्या कमी होत असल्यामुळे त्यांच्या संवर्धनावर विचारमंथन करण्यासाठी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय पशुधन संस्थेच्या डॉ. थन्नामल, हिस्सार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ. हरिशंकर सिंघा, राहत संस्थेचे डॉ. उप्रेती, सगरोळी (जि.नांदेड) येथील धर्मा गर्दभ अभायरण्याचे डॉ. माधव ताटे, सोलापूरच्या अशासकीय संस्थेचे डॉ. सत्यजित पाटील, पशुवैद्यक महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद पाटील, डॉ. साजीद अली डॉ. ए. बी. ए. सिद्दिकी, डॉ. मकरंद खरवडकर, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. श्रीनिवास कार्ले, डॉ. लाड, डॉ. गळाकाटू, डॉ. शेख नुर, डॉ. सोळुंके आदीसह राज्याच्या विविध भागातील ४० अश्ववर्गीय पशुपालक उपस्थित होते.

या चर्चासत्रा दरम्यान, या प्राण्यांच्या संवर्धनांसाठी रोग प्रतिबंधक करण्यासाठी रक्त नमुन्याची तपासणी करणे, वेळेवर उपचार त्यासोबतच जिल्हानिहाय पशुकल्याण स्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, आदी शिफारशी करण्यात आल्या. या चर्चासत्रात नांदेड, सगरोळी (जि. नांदेड), कळंब (जि. उस्मानाबाद), अंबाजोगाई (जि. बीड) आदी ठिकाणचे घोडे, गाढव सांभाळणारे मालक सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT