खानदेशातही कापसावर लष्करी अळी
खानदेशातही कापसावर लष्करी अळी 
मुख्य बातम्या

खानदेशातही कापसावर लष्करी अळी

टीम अॅग्रोवन

जळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील अनेक भागात कापूस पिकावर अमेरिकन लष्करी अळी आढळली आहे. मका व ज्वारी पिकांनजीक असलेल्या कापूस पिकात ही अळी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  खान्देशात (नंदुरबारसह) सुमारे आठ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. सर्वाधिक पाच लाख हेक्टरवर लागवड जळगाव जिल्ह्यात झाली. खान्देशात पूर्वहंगामी लागवड दीड लाख हेक्टरवर आहे. लष्करी अळी पूर्वहंगामी कापूस पिकात दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, जळगाव आदी भागात ही अळी दिसली आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर व धुळे तालुक्यांत ही अळी १५ दिवसांपूर्वी कापूस पिकात फोफावली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  ज्या कापूस पिकाच्या क्षेत्रानजीक मका पीक आहे, त्यात कापूस पिकात पहिल्या तीन, चार ओळीत ही अळी आहे. ती कैऱ्या पोखरून टाकत आहे. यामुळे बोंड उमलनार नाही. ज्या कैरीत ही अळी शिरते, त्यात १०० टक्के नुकसान करीत आहे. अद्याप प्रकोप सुरवातीच्या स्थितीत आहे. पण यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, उपाययोजना कुठल्याही सुरू नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कापूस खान्देशचे प्रमुख पीक आहे. त्यावरील लष्करी अळीचे संकट दूर झाले नाही तर शेतकरी पुरते अडचणीत येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अळीबाबत सर्वेक्षण झालेले नसल्याने नुकसानीची पातळी, क्षेत्र याबाबत नेमकी माहिती कापूस तज्ञ व कृषी यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.  ‘घाबरून जाण्याचे कारण नाही’ मका पिकानजीक जेथे कापूस पीक आहे, तेथे ही अमेरिकन लष्करी अळी असू शकते. पण कापूस पिकात ही अळी जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावल्याची स्थिती नाही. तसेच ही अळी कापूस पिकात अधिक दिवस जिवंत राहू शकत नाही. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती कापूस संशोधन केंद्रातील पैदासकार संजीव पाटील यांनी दिली.  प्रतिक्रिया मका पिकावरील लष्करी अळी कापूस, ज्वारी पिकात आली आहे. तिचा कापूस पिकातील अटकाव लवकर झाला नाही तर शेतकरी पुरते आर्थिक संकटात सापडतील. - शिवाजी बोरसे, शेतकरी, चिंचखेडा (जि. धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT