Almost rabbi sowing in Pathrud
Almost rabbi sowing in Pathrud 
मुख्य बातम्या

पाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग

टीम अॅग्रोवन

पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

ज्वारीच्या पेरणीस परतीच्या पावसामुळे तब्बल तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे बैल बारदाना (बैलजोडी ) असणाऱ्या शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या दमदार पावसामुळे हस्त नक्षत्रामध्ये पेरणी झालेली ज्वारीचे पिके मोडून दुबार पेरणी करावी लागत आहे. 

गेल्या पाच - सहा दिवसांपासून जमिनीत वाफसा आल्याने शेतकरी पेरणीची घाई करू लागले आहेत. ज्वारीच्या उत्पादनासाठी भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील भाग प्रसिद्ध आहे. मालदांडी, झुट, सफेदगंगा, बेद्रे, पाण्याचे दगडे, माळ दगडे या वाणांची पेरणी होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे वाफसा येण्यास विलंब झाला.

एक दिवसाचे बैलजोडीचे भाडे १२०० ते दीड हजार रुपये आहे. अनेक शेतकऱ्यांना बैल, बारदाना मिळत नसल्याने काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करीत आहेत.  पेरणीस उशीर झाल्यामुळे हरभरा, गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

काही शेतकरी असे सांगतात की तुळशीच्या लग्नापर्यंत ज्वारीची पेरणी केली, तरी चांगले उत्पन्न मिळते. परतीचा पाऊस भरपूर चांगला झाल्याने पाणीसाठा वाढला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT