Almost all the farmers in Khandesh to save their crops
Almost all the farmers in Khandesh to save their crops 
मुख्य बातम्या

खानदेशात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ, पावसाळी वातावरण आहे. गेले दोन दिवस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही भागात हलका पाऊस, वेगवान वारे, अशी स्थिती होती. मंगळवारीदेखील (ता.१८) अशीच स्थिती कायम आहे. त्यामुळे बाजरी पिकाची मळणीची तयारी, कणसे झाकणे आदी कामे पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे. 

शेतातील कडब्याची कुट्टी करून तिची घरी किंवा गोठ्यात साठवणूक करण्याची कार्यवाही मंगळवारी अनेक भागात वेगात सुरू होती. कापूस लागवडीसाठी पूर्वमशागतदेखील शेतकरी पूर्ण करून घेत आहेत. कारण कमी अधिक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मशागतीसंबंधी अडथळे येतील. 

मंगळवारीदेखील सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण होते. सुसाट वारा अधूनमधून सुरूच होता. यामुळे केळी उत्पादकांमध्ये भीती वाढली. हवामानशास्त्र विभागाने चक्रीवादळाचा परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे, तरीदेखील खानदेशात केळी उत्पादक पक्व झालेली केळी खराब वातावरणामुळे काढणी करून घेत आहेत. गेले सहा - सात दिवस ढगाळ वातावरण असल्याने ऊन कमी आहे. उकाडा मात्र आहे. शेतातील काढणी, चारा वाहतुकीच्या कामाला गती आली आहे. 

धुळे, शिंदखेडा, जळगाव, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ भागात गेले दोन दिवस हलका, मध्यम पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे केळी पिकातील वाफसादेखील कायम आहे. सिंचन करण्यासाठी पाण्याची गरज आहे. 

केळीचे नुकसान

सुसाट वाऱ्याने रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा भागात पक्व झालेले केळीचे घड निसटण्याची समस्यादेखील तयार झाली आहे. अनेक झाडे मोडून पडली आहेत. काढणीवरील केळी बागांमध्ये एक ते दोन टक्के नुकसान झाल्याची माहिती आहे. सुसाट वाऱ्याने केळी पिकात पाने फाटण्याची समस्यादेखील तयार झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT