पुणे जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी
पुणे जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता.१) देखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी अनेक भागात जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये शिरूर येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  

जिल्ह्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे भात, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा, बटाट्यासह भाजीपाला आणि फुलपिकाचे नुकसान वाढतच आहे. काही भागात पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी पिके वाहून गेली. शुक्रवारी सकाळपासून ढग जमा होत होते. उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. शिरूर, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, बारामती, पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी सकाळी अनेक भागात दाट, धुक्यासह दव पडल्याचे दिसून आले. हवेत गारठाही जाणवू लागला आहे. 

जिल्ह्यातील पाऊस (मि.मी) (स्रोत : महसूल विभाग) : 

खडकवासला १०, थेऊर २५, खेड-शिवापूर १०, माले १०, काळे कॉलनी १२, शिवणे १४, वेल्हा २९, पानशेत १६, विंझर २३, आंबवणे १८, जुन्नर १२, नारायणगाव १८, निमगाव १०, राजूर १९, डिंगोरे १३, राजगुरुनगर १५, कुडे १५, चाकण १२, शेलपिंपळगाव १०, कण्हेरसर १२, घोडेगाव १७, आंबेगाव १०, कळंब १५, पारगाव १८, मंचर १६, वडगाव रसाई १५, रांजणगाव १०, शिरूर ५०, बारामती ४५, मालेगाव १४, वडगाव १५, लोणी भापकर ११, सुपा १२, अंथुर्णे २०, सणसर १३, सासवड १०, कुंभारवळण २२, जेजुरी १०, परिंचे ११, राजेवाडी १५, वाल्हे २५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT