अकोट तालुक्यात कपाशी वाळू लागली
अकोट तालुक्यात कपाशी वाळू लागली 
मुख्य बातम्या

अकोट तालुक्यात कपाशी वाळू लागली

टीम अॅग्रोवन

अकोला : जुलै महिन्यात पडलेला पाऊस थांबताच अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आकोलखेड-आंबोडा शिवारातील कपाशीचे उभे पीक सुकण्यास सुरवात झाली. अनेकांच्या कापूस पिकात ही समस्या उदभवली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासकीय यंत्रणा व तज्ज्ञ सध्या बोंड अळीच्या विषयातच व्यग्र असल्याने अद्यापही शासकीय तज्ज्ञांचे पथक या भागात पोचले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परिणामी, पीक सुकण्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत निदान होऊ शकलेले नाही.

 जुलै महिन्यात पाऊस थांबल्यानंतर आकोलखेड-आंबोडा शिवारात कपाशीच्या पिकात झाडे वाळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. घनश्याम बिजणे, कैलास पाटील, नारायण बायवार, सुभाष बिजणे, विष्णू धुवे, गजानन बायवार, नारायण मुंडोकार, अशोक धुवे, देविदास जांभळे, गजानन सावरकर, रितेश जांभळे, धनंजय देशमुख, विनय देशपांडे यांच्यासह इतरांच्या शेतातील कपाशीचे पीक सुकले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तलाठी, कृषी सहायक; तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अद्यापही विद्यपीठातील तज्ज्ञ शेतांमध्ये पोचले नसल्याने पीक सुकण्यामागील नेमके शास्त्रीय कारण काय आहे, त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.

या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तज्ज्ञांचे पथक पाठवण्याबाबत व तातडीने मार्गदर्शन करण्याबाबत मागणी केली; परंतु आठवडा उलटला तरी तिकडे कुणी फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. रोग समजून काही शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी, ड्रेंचिगही केले. परंतु याचा फारसा फायदा झालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT