Akola Zilla Parishad got Rs 15 lakh from land lease
Akola Zilla Parishad got Rs 15 lakh from land lease 
मुख्य बातम्या

अकोला जिल्हा परिषदेला जमीन भाडेपट्ट्यातून मिळाले १५ लाख

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची शेती असून दहा महिन्यांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. यावर्षी १९० एकर जमिनीच्या बोलीतून जिल्हा परिषदेला १५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या काळात एकीकडे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले असताना जिल्हा परिषदेला शेतीने आधार दिला आहे.

अकोला जिल्हा परिषदेची बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार आणि हाता अंदुरा या ठिकाणी १९० एकर शेती आहे. ही शेती खरिपात लागवडीसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना ठोक्याने दिली जाते. यंदा या जमिनीचा नुकताच लिलाव करण्यात आला. दहा महिन्यांच्या भाडेपट्टयाने ही शेती शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली. या एकूण शेतीच्या भाडेपट्ट्यातून १५ लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

सध्या कोरोनामुळे शासनाचे उत्पन्नाचे स्त्रोत थांबलेले आहेत. करवसुली, योजनांसाठी निधी खर्च थांबलेला आहे. अशा काळात शेतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला तब्बल १५ लाख ६८ हजार रुपये मिळाले.

जिल्हा परिषेदच्या मालकीची दोन ठिकाणी जमीन आहे. ही जमीन आपण दरवर्षी दहा महिन्याच्या ठोक्याने देतो. ही प्रक्रिया बोली पद्धतीने राबविल्या जाते. यासाठी मागील पाच वर्षात आलेल्या रकमेची सरासरी काढून दर निश्‍चित करतो. त्यानुसार यंदा विक्री झाली. यातून जिल्हा परिषदेला १५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. हा निधी जिल्हा परिषद शेष फंडात टाकणार आहोत. त्यातून जिल्हा परिषद शेतकऱ्यांसाठी योजना राबवेल. - डॉ. मुरली इंगळे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT