अकोला जिल्ह्यात पीकविम्याचे पैसे मिळणार
अकोला जिल्ह्यात पीकविम्याचे पैसे मिळणार 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात पीकविम्याचे पैसे मिळणार

टीम अॅग्रोवन

अकोला : ‘‘पीकविम्याचे पैसे न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या मंडळामध्ये पीकविमा लागू झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पीक विम्याची पावती आहे, त्यांना येत्या काही दिवसांत हे पैसे मिळतील``, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळपीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनीचे श्याम चिवरकर आदींसह अन्य विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले. पीक विमा रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली. बोंड अळीची नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी,  अशा मागण्या बैठकीत शेतकऱ्यांनी केल्या. पीकविमा जमा होण्यात झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पांण्डेय यांनी घेऊन जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले. पैसे जमा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा बॅंकेला दिला.

ज्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ भेटला नाही, त्यांची यादी येत्या तीन आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव नसलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने कार्यवाई करून लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  मार्च-२०१७ पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले आहेत, याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय बँक समितीकडे प्रस्ताव पाठविण्याबाबतची सूचनाही करण्यात आली.

पीक विमा भरपाईच्या दोन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी पहिली यादी सहा जून रोजी प्रसिद्ध झाली. सुमारे ६३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरी यादी १६ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून, या द्वारे सुमारे ३९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तिसरी यादी येत्या तीन आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याद्वारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील, अशी माहिती विमा कंपनीचे चिवरकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT