In Akola district, Rs 37 lakh was spent on 'Magel Tyala Shettale'
In Akola district, Rs 37 lakh was spent on 'Magel Tyala Shettale' 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’चे ३७ लाख थकले

टीम अॅग्रोवन

अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून अनुदान रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कृषी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहेत. सुमारे ३७ लाख रुपये शासनाकडून मिळाले नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

सोमवारी (ता.२) अकोल्यात इतर मागण्यांसोबतच या मुद्यांवरून शेतकरी तरुणांनी आकाशवाणी टॉवरवर चढून आंदोलन केले. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्‍चित झाल्याने कोरडवाहू क्षेत्राला याचा मोठा फटका बसतो आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. पावसात पडणारा खंड, पाणी समस्या व त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व्यापक पातळीवर शेततळ्यांची संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने २०१६ पासून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबवली जात आहे.  

शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून अंमलबजावणी करण्याचे तत्कालीन सरकारने जाहीर केले होते. यापूर्वी राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना व रोजगार हमी योजनेतून शेततळी केली जात होती. या योजनेतून जास्तीत जास्त ३० बाय ३० बाय ३ मिटर व कमीत कमी १५ बाय १५ बाय ३ मिटर आकारमानाचे शेततळे घेता येते. 

शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्यासाठी पुढाकार घेतला. काहींनी व्याजाने पैसे काढले. काहींनी स्वतःच्या पदराचा पैसा खर्च केला. परंतु, आता अनुदानाची आडकाठी आली आहे. अनुदान वितरित करण्यासाठी स्थानिक पातळीवरून शासनाकडे वारंवार निधीची मागणी केल्या गेली. परंतु, निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT