नगर गारठले; पाच अंशांपर्यंत तापमान घटले
नगर गारठले; पाच अंशांपर्यंत तापमान घटले 
मुख्य बातम्या

नगर गारठले; सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद

टीम अॅग्रोवन

पुणे : देशातून माॅन्सून परतल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू झाले. राज्यातील नगर आणि परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमध्ये १२.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आज (ता. २७) पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातही बुधवार (ता. १) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणातील आर्द्रता कमी होत असून, हवामान कोरडे होऊ लागले आहे. त्यातच सूर्य दक्षिणेकडे काही प्रमाणात सरकला असून, सूर्यकिरणे तिरपी पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणातील रत्नागिरी येथे ३६.३ अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली.  विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. परभणी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.२ अंश सेल्सिअसने घट होऊन १४.३ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नगरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. नागपूर, कोल्हापूर, जळगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत दोन ते अडीच अंश सेल्सिअसने घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल आणि किमान (कंसात) तापमान अंश सेल्सिअसमध्ये :  मुंबई ३४.७ (२५.०), सांताक्रूझ ३६.१ (२३.३), अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३६.३ (२३.७), डहाणू ३५.० (२२.२), पुणे ३१.७ (१६.४), नगर - (१२.७), जळगाव ३५.२(१६.२), कोल्हापूर ३१.२ (२१.५), महाबळेश्वर २८.६ (१८.०), मालेगाव ३४.० (१६.५), नाशिक ३२.३ (१४.३), सांगली - (२०.१), सातारा ३३.१ (१७.५), सोलापूर ३४.२ (१८.०), उस्मानाबाद ३२.१ (१४.३), औरंगाबाद ३३.४ (१५.८), परभणी ३४.२ (१४.३), नांदेड ३५.५ (१९.०), अकोला ३५.४ (१७.१), अमरावती ३१.८ (१७.०), बुलडाणा ३२.० (१७.५),  ब्रह्मपुरी ३५.० (१८.२), चंद्रपूर ३४.४ (२०.२), गोंदिया ३३.६ (१७.२), नागपूर ३४.२ (१६.५), वर्धा ३४.० (१७.०), यवतमाळ ३४.५ (१५.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

SCROLL FOR NEXT