भातशेती पाण्याखाली
भातशेती पाण्याखाली 
मुख्य बातम्या

कोकणला पावसाचा तडाखा

sandeep navale

  पुणे ः कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवार (ता. १८) पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. १९) तळकोकणाला मुसळधार पावसाने झोडपले, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाचा जोर होता.

काही ठिकाणी दमदार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांसह धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. हर्णे येथे सर्वाधिक ३७० मिलिमीटर पाऊस पडला.

राज्यातील 104 मंडळांत अतिवृष्टी कोकण ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा अशा एकूण 104 मंडळांत अतिवृष्टी झाली.

हर्णे येथे सर्वाधिक 370 मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असल्याची नोंद रविवारी (ता. 19) सकाळी हवामान विभागाकडे झाली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रविवारी (ता. 19) दिवसभर पडला.

मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यातील महाबळेश्वर, वाई, पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड अशा काही तालुक्‍यांतील मंडळांत हलका ते मध्यम पाऊस पडला. नाशिकमधील इगतपुरी भागातही हलका पाऊस पडला. उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमधील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी सकाळपासून ऊन पडल्याचे चित्र होते. नगर, सोलापूर, सातारा, सांगलीतील काही भागांत पावसाचा जोर कमी असून, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊनही होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत ढगाळ हवामान होते. तर अनेक भागांत सकाळपासून ऊन पडल्याचे चित्र होते.

त्यामुळे सकाळपासून उकाडा जाणवत होता. काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरीही बरसल्या. विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती होती. त्यामुळे वातावरणात दमटपणा वाढून कमाल तापमानात वाढ झाली होती.

कोकणातील रायगड जिल्ह्यात महाड, नाते, तुडीळ, म्हसाळा, खामगाव मंडळांत अतिवृष्टी झाली. रत्नागिरीतील चिपळून, खेर्डी, मार्गतम्हाने, रामपूर, वहाळ, सावर्डे, असुर्डे, कालकावने, शिरगाव, दापोली, बुरोडी, दाभोळ, अंजुर्ला, वाकवली, पालगड, खेड, शिर्शी, आंबावली, भारने, दाभीळ, गुहागर, तळवली, पतपन्हळे, आंब्लोली, हेडवी, मंडनगड, म्हापरळ, देव्हरे, रत्नागिरी, खेडशी, पावस, जयगड, फनसोप, कोतवडे, मालगुंड,

पाली, कांदवाई, मुरदेव, माखजन, फनसावने, आंगवली, कोंडगाव, देवळे, देवरुख, तुलसानी, तेल्हे, राजापूर, सौंदळ, कोढेया, जैतापूर, कुंभावडे, नाते, ओनी, लांजा, भांबेड, पुनस, सातवली, विलवडे मंडळांत अतिवृष्टी झाली. सिंधुदुर्गमधील देवगड, बापर्डे, मालवण, पेढूर, मासुरे, श्रावण, आचरा, पोयीप, सावंतवाडी, बांदा, आजगाव, अंबोली, मादुरा, वेंगुर्ला, शिरोडा, कणकवली, म्हापन, फोंडा, सांगवे, वागडे, कुडाळ, कदावळ, कासाळ, मानगाव, पिंगुळी, वैभववाडी, येडगाव, भुईबावडा, तळवात, भेंडाशी मंडळांत अतिवृष्टी झाली. उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते.

मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्री, नंदुरबारमधील खांदबरा, सोमावळ, जळगावमधील लासूर, साताऱ्यातील हेळवक, महाबळेश्वर, तापोळा, लामज, कोल्हापुरातील गगनबावडा, सालवन, औंरंगाबादमधील सिल्लोड मंडळात अतिवृष्टी झाली. उर्वरित काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अनेक भागांत ढगाळ, काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज आज (ता. 20) मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. बुधवार (ता. 21)पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारपर्यंत (ता. 23) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. मंगळवारी (ता. 19) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) रायगड ः महाड 89, नाते 81, तुडीळ 83, म्हसाळा 116.4, खामगाव 148.7, रत्नागिरी ः चिपळून 220, खेर्डी 212, मार्गतम्हाने 175, रामपूर 180, वहाळ 105, सावर्डे 81, असुर्डे 135, कालकावने 110, शिरगाव 171, दापोली 253, बुरोडी 175 दाभोळ 175, अंजुर्ला 83, वाकवली 180, पालगड 164, खेड 82, शिर्शी 84, आंबावली 77, भारने 170, दाभीळ 115, गुहागर 115, तळवली 130, पतपन्हळे 170, आंब्लोली 130, हेडवी 85, मंडनगड, 137, म्हापरळ 100, देव्हरे 76, रत्नागिरी 98, खेडशी 105, पावस 75, जयगड 96, फनसोप 98, कोतवडे 87, मालगुंड 82, पाली 153.9, कांदवाई 97, मुरदेव 108, माखजन 113, फनसावने 108, आंगवली 75, कोंडगाव 135, देवळे 80, देवरुख 105, तुलसानी 112, तेल्हे 147, राजापूर 118, सौंदळ 90, कोढेया 134, जैतापूर 197, कुंभावडे 99, नाते 195, ओनी 84, लांजा 74, भांबेड 83, पुनस 92, सातवली 80, विलवडे 97, सिंधुदुर्ग ः देवगड 71, बापर्डे 74, मालवण 127, पेढूर 91, मासुरे 110, श्रावण 105, आचरा 120, पोयीप 98, सावंतवाडी 112, बांदा 118, आजगाव 136, अंबोली 215, मादुरा 212, वेगुर्ला 118, शिरोडा 123, कणकवली 139, म्हापन 84, फोंडा 102, सांगवे 98, वागडे 107, कुडळा 158, कदावळ 72, कासाळ 135, मानगाव 162, पिंगुळी 147, वैभववाडी 94, येडगाव 105, भुईबावडा 104, तळवात 90,भेंडाशी 110, धुळे ः साक्री 70, नंदुरबार ः खांदबरा 76, सोमावळ 80 जळगाव ः लासूर 72 सातारा ः हेळवक 124, महाबळेश्वर 115, तापोळा 83.3, लामज 105.1 कोल्हापूर ः गगनबावडा 102, सालवन 107, औंरंगाबाद ः सिल्लोड 70

दृष्टीक्षेपात

  • खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले
  • गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता
  • राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले
  • पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना धोकाचा इशारा
  • सातारा जिल्ह्यात घेवडा पिकाच्या नुकसानीची भीती
  • मंडणगडमध्ये वादळी पावसाने झाडे उन्मळली
  • हर्णै, दापोली आंजर्ले बंदरात पाच मासेमारी नौका उलटल्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT