संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

'उजनी'ची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तोंड देण्याची वेळ येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणाचे स्थान महत्त्वाचे आहे. विशेषतः पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ आणि मंगळवेढ्याचा काही भाग या पाण्यावरच अवलंबून आहे. या धरणातून सोलापूर शहरासह जवळपास १२० हून अधिक पाणी योजनांना पुरवठा होतो. शिवाय आठमाही योजनेमुळे रब्बी, खरीप आणि आता उन्हाळी हंगामातही शेतीला धरणातून पाणी पुरवले जाते. 

गेल्याच महिन्यात २४ मार्चला शेतीसाठी उन्हाळी हंगामातील पहिली पाळी सोडण्यात आली आहे. सुमारे १५ हजार क्‍युसेक इतके पाणी त्यासाठी सोडले आहे. नियोजनानुसार आणखी एक पाळी सोडण्यात येणार आहे. पण पाण्याची सध्याची स्थिती पाहता, या एका पाळीवरच नियोजन संपवले जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात ३८ टक्‍क्‍यांवर असलेली पाणीपातळी या दोन-तीन दिवसांत वेगाने घटली आहे. 

सोमवारी (ता. ९) धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.२९५ मीटर होती. तसेच २२९९.९४ दलघमी (८१.२२ टीएमसी) इतका एकूण साठा होता. त्यापैकी ४९७.१३ दलघमी (१७.५६ टीएमसी) इतका उपयुक्त साठा होता. तर पाण्याची टक्केवारी ३२.७७ टक्के इतकी होती. सध्या उनाची तीव्रता वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ४० अंश सेल्सियसच्या पुढे तापमानाचा पारा चढला आहे. येत्या काही दिवसांत ही तीव्रता जसजशी वाढेल, तशी पाणीपातळीत आणखी घट होण्याची आणि टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT