संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

उदगीरमध्ये नाफेडकडे नऊ कोटी थकले

सकाळ वृत्तसेवा

उदगीर, जि. लातूर ः चालू हंगामात नाफेडतर्फे उदगीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची सुरू असलेली खरेदी गोदामाअभावी बंद करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर फेब्रुवारीपासून तुरीची विक्री केलेल्या १,८६७ शेतकऱ्यांचे ९ कोटी २० लाख ७४ हजार २६२ रुपयांची रक्कम नाफेडकडे थकीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

सोमनाथपूर (ता. उदगीर) भागात फेब्रुवारीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी आजपर्यंत ६८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी १९०९ शेतकऱ्यांची या खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात आलेली आहे. त्यापैकी ता. सात फेब्रुवारीपर्यंतच्या ४२ शेतकऱ्यांची २५२ क्विंटल ३० किलो तूर खरेदीपोटी १३ लाख ७५ हजार ३५ रुपये इतकी रक्कम या ४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात आली आहे; तर ता. आठ फेब्रुवारीनंतर तूर विक्री केलेल्या १८६७ शेतकऱ्यांची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.

शेतकऱ्यांच्या तुरी नाफेडकडे हमीभाव मिळेल या अपेक्षेने विक्री करूनही अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रावर आजपर्यंत १,९०९ शेतकऱ्यांची १७,४१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या ४,८९१ शेतकऱ्यांची तूर खरेदी रखडलेली आहे. अशातच खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी नाफेडकडे जागा नसल्याने खरेदी केंद्रावर तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रावरील तुरीचा काटा बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना परत जावे लागले. तूर साठवणुकीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देऊन तुरीचा काटा चालू करावा. शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करून रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने काटा बंद करण्यात आला आहे. नाफेडने तत्काळ गोदाम उपलब्ध करून देऊन नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा लवकर करून रक्कम अदा करावी. शेतकऱ्यांचे हरभरा हे पीक निघाले असून हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी सतराशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. आणखी दोन हजार शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन नोंदणीसाठी आले आहेत. त्यामुळे तूर खरेदी लवकर संपवून हरभरा खरेदी सुरू करणे गरजेचे आहे.  - भरत चामले,  अध्यक्ष, तालुका खरेदी-विक्री संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT