शहादा, जि. नंदुरबार : हरभरा व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.९) शहादा येथे मोर्चा काढला. या वेळी भाजीबाजार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी दगडफेकही झाली.
शहादा, जि. नंदुरबार : हरभरा व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.९) शहादा येथे मोर्चा काढला. या वेळी भाजीबाजार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी दगडफेकही झाली. 
मुख्य बातम्या

शहाद्यात 'स्वाभिमानी'च्या बंदला हिंसक वळण

टीम अॅग्रोवन

नंदुरबार  ः शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीमालास हमीभाव मिळावा व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता. ९) हिंसक वळण लागले. यात पोलिसांनी भाजीबाजारातील व्यवहार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. 

शहादा येथे शनिवारी (ता. ७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनश्याम चौधरी व सचिन पाटील यांनी हरभरा व इतर शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सोमवारी (ता. ९) या उपोषणाचा तिसरा दिवस होता. सोमवारी संघटनेने शहादा बंदची हाक दिली होती. यामुळे शहादा बाजार समितीमधील लिलाव बंद होते. 

सकाळी कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली व मोर्चा काढला. यातच पोलिस स्टेशनजवळील भाजीबाजार सुरू असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्ते भाजीबाजार बंद करीत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद झाला. तणाव वाढल्याने दगडफेकही झाली. या वेळी पोलिसांनी लाठीमारही केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी धनश्याम चौधरी व सचिन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT