संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यातून सात हजार टन द्राक्षांची निर्यात

टीम अॅग्रोवन

सांगली : यंदाचा निर्यातक्षम द्राक्ष हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातून युरोपीय देश, रशिया, आखाती देशांत द्राक्ष निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून ५३१ कंटेनर म्हणजे ६ हजार ९०३ टनाची द्राक्षांची निर्यात झाली आहे. या महिनाअखेरीस निर्यातक्षम द्राक्षांचा हंगाम संपण्याची शक्‍यता आहे.  

गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात अंदाजे दोन हजार टनाने द्राक्षांची निर्यात अधिक होण्याचा अंदाज आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम गतवर्षीपेक्षा पंधरा दिवस लवकर संपण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यातील तासगाव आणि खानापूर तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणातून द्राक्षाची निर्यात होते. या दोन तालुक्‍यांसह अन्य तालुक्‍यांतूनदेखील द्राक्षाची निर्यात होते. जिल्ह्यात दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होते आहे. यंदाच्या हंगामात १ हजार ३० हेक्‍टर निर्यातक्षम द्राक्षाच्या क्षेत्राची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. यंदा अनुकूल हवामान असल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता द्राक्षबागायतदारांनी व्यक्त केली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि गेल्यावर्षी कमी अधिक झालेला पाऊस अशा परिस्थितीतदेखील निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्रात वाढ झाली आहे. 

यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षांची निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निर्यातक्षम द्राक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची चांगल्याप्रकारे जोपासना केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी द्राक्ष तज्ज्ञांचे सल्लेही घेतले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र, बदलते वातावरणामुळे निर्यातक्षम द्राक्षामधील सुक्रोज कमी असल्याने निर्यातक्षम द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला आहे. 

निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम जरी उशीरा सुरू झाला असला तरी, द्राक्षाला परदेशातून मोठी मागणी सुरू आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे दर ६० ते ९० रुपये प्रति किलोस असे असून दर स्थिर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंदाच्या हंगाम गतवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर संपण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT