रेशीम उद्योग
रेशीम उद्योग 
मुख्य बातम्या

रेशीम उद्योगाचा भार अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे

टीम अॅग्रोवन

पुणे : रेशीम उद्योगाला पश्‍चिम महाराष्ट्रात मोठा वाव आहे. त्यासाठी चालना देण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूर्ण वेळ सहायक संचालक असण्याची गरज आहे. परंतु, गेल्या महिन्यात प्रादेशिक रेशीम कार्यालयातील रिक्त झालेले सहायक संचालक पद काही दिवस भरण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रादेशिक रेशीम कार्यालयाचा भार अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे.   पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत पुणे विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार तर कोकणातील ठाणे जिल्ह्याचा यामध्ये समावेश होतो. पूर्वी ही जिल्हे रेशीमसाठी तुतीचे हब म्हणून ओळखली जात होती. परंतु, गेल्या चार ते पाच वर्षापासून पाणीटंचाई असल्याने तुती लागवडीच्या क्षेत्रात घट आली होती.  यंदा पुणे विभागातील दहा जिल्ह्यात तुती लागवडीचे १६५० एकराचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी एक हजार ९९६ एकरांची दोन हजार ८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, शासकीय योजना शेतकऱ्यापर्यत पोचविण्यासाठी पूर्ण वेळ सहायक संचालकासह इतर कर्मचारी असण्याची आवश्‍यकता आहे. गेल्या महिन्यातील २४ ऑगस्ट रोजी पूर्ण वेळ असलेले सहायक संचालक पी. एन. चलपेलवार यांची नागपूर येथील रेशीम संचालनालयात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून हे पद रिक्त असून सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार नगर येथील रेशीम विकास अधिकारी कविता देशपांडे यांच्याकडे देण्यात आला आहे. 

नागपूर येथील रेशीम संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे प्रादेशिक कार्यलयातील सहायक संचालक पद हे मंत्रालयातून भरले जाते. त्यामुळे नक्की हे पद कधी भरले जाणार आहे, हे सांगता येणार नाही. पुणे जिल्ह्यातील रेशीमचा पदभार सोलापूरकडे  गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या रेशीम विकास अधिकारी असलेल्या प्रणिता संखे-पांडे यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना पकडले. त्यामुळे हे पद गेल्या दीड ते दोन महिन्यापासून रिक्त असून त्याचा अतिरिक्त पदभार सोलापूर येथील जिल्हा रेशीम विकास अधिकारी असलेले जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी असलेले पद सासन नक्की कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT