जळगावमधील पिकांना पावसाअभावी फटका
जळगावमधील पिकांना पावसाअभावी फटका 
मुख्य बातम्या

जळगावमधील १४६७ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांवर

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्ह्यातील १४६७ गावांची हंगामी पैसेवारी ही ५० पैशांवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ही हंगामी पैसेवारी आहे, अद्याप अंतिम पैसेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे गावांची आकडेवारी किंवा संख्या यात पुढील काळात बदल शक्‍य असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जानेवारीतच पाणीटंचाई भासेल, त्यामुळे पैसेवारीवर न जाता अधिकाधिक गावांचा समावेश टंचाई आराखड्यात करावा, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कोणत्याच महिन्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. काही गावे अपवाद असतील, परंतु सर्वत्र कपाशी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांना फटका बसला. आता पैसेवारीचा खेळही चुकीचा दिसतोय. तो शेतकरी व ग्रामस्थांविरोधात जात आहे.

दुष्काळसदृश स्थिती आहे, पण दुष्काळ नाही, असे शाब्दिक खेळ करून शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवले जाऊ नये. अमळनेर, पाचोरा, पारोळा, जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर असा सर्वत्र पाऊस हव्या त्या वेळी आला नाही. दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. जिल्ह्यातील गावांची अंतिम पैसेवारी डिसेंबरमध्ये जाहीर होईल. आता हंगामी पैसेवारीनंतर सुधारित पैसेवारीसंबंधी कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे मिळाली.

५० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत जिल्ह्यात केवळ ५० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. जिल्ह्यात १५०२ गावे असून, यातील केवळ ५० गावे सध्या दुष्काळी स्थितीत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. उर्वरित १४६७ गावांमध्ये आलबेल स्थिती आहे, असा याचा अर्थ नाही, असे यावर शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT