राळेगणसिद्धी (जि. नगर) ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (छायाचित्र ः गणेश भापकर, राळेगणसिद्धी).
राळेगणसिद्धी (जि. नगर) ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. (छायाचित्र ः गणेश भापकर, राळेगणसिद्धी). 
मुख्य बातम्या

राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्यामुळे राळेगणसिद्धी (जि. नगर) येथेही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी गावातील मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला. याशिवाय उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह विठ्ठल गोविंद मापारी, ज्ञानेश्‍वर हावळे या तिघांनी यादवबाबा मंदिरासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला.  

शेतीमालाला दर मिळण्यासह शेतीचे प्रश्‍न सुटावेत, लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि इतर विविध प्रश्‍नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन सुरू केल्यामुळे शुक्रवारपासून (ता. २३) अण्णा हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी येथे गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. शनिवारी सकाळी प्रभातफेरी काढून राळेगण-वाढेगव्हाण रस्त्यावर मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको अंदोलन केले. 

दरम्यान अण्णा हजारे यांच्या मागण्याची दखल घेतली नाही तर लढा अधिक तीव्र करणार असल्याचे माजी सरपंच जयसिंग मापारी, बाळासाहेब पठाडे, उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले यांनी निवेदन स्वीकारले.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार  अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेले सत्याग्रह आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने रेल्वे, वाहने अडविण्यात आली. त्यामुळे उद्या रविवारी (ता.२५) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री जर हॅलिकॉप्टरने थेट पाथर्डीला गेले तर थेट पाथर्डीत जाऊन हजारे समर्थक काळे झेंडे दाखविणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT