संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होईल.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या संदर्भात गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांच्या समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. नागपूर अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा होते. अधिवेशनात होणाऱ्या चर्चेच्या अनुषंगाने निधी देताना मार्च महिना उजाडतो. तसेच पुरवणी मागण्यांमधूनही विदर्भाला न्याय मिळत नाही, अशी सरकारची भावना आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT