रब्बी पेरणी
रब्बी पेरणी 
मुख्य बातम्या

नगरमध्ये सात लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज

सुर्यकांत नेटके

नगर : जिल्ह्यात कृषी विभागाने सात लाख १३ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीसाठीचे सरसरी क्षेत्र निश्‍चित केले आहे. या वर्षी निश्‍चित केलेल्या सरासरी हेक्‍टर क्षेत्रानुसार रब्बी हंगामासाठी नियोजन केले जात असून, बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. रब्बीत सर्वाधिक ५ लाख हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना फटका सोसावा लागत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झालेला असून, जवळपास सर्व धरणे, तलाव, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. परतीचा पाऊसही चांगला पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानुसार रब्बी हंगामाची स्थिती ठरणार आहे.

जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात सरासरी सात लाख १३ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यात ज्वारीची पाच लाख हेक्‍टरवर, गव्हाची नव्वद हजार हेक्‍टर, मक्याची २५ हजार, हरभऱ्याची ९५ हजार, करडईची आकराशे, सूर्यफूल, जवस आणि तिळाची प्रत्येकी दोनशे हेक्‍टरवर पेरणी होण्याची अंदाज आहे. 

यंदा झालेल्या चांगल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर उन्हाळी पिकांचीही चांगली पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. उन्हाळ्यात भुईमुगाची पंधरा हजार, मक्याची वीस हजार मुगाची एक हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या रब्बी हंगामाच्या नियोजनानुसार बियाण्यांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT