पदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात बदलले बदलीचे ठिकाण
पदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात बदलले बदलीचे ठिकाण 
मुख्य बातम्या

पदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात बदलले बदलीचे ठिकाण

टीम अॅग्रोवन

नागपूर  : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक असलेल्या पदोन्नतीवरील २९ कृषी अधिकाऱ्यांनी गॉडफादरच्या मदतीने कर्तव्यावर रुजू न होताच हातोहात बदलीचे ठिकाण बदलल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घडामोडीमुळे कृषी विभागही चक्रावून गेला आहे.  उन्हाच्या तीव्रतेबाबत विदर्भाचा राज्य, तसेच देशपातळीवर पहिला नंबर लागतो. त्यासोबतच येथील अनेक विभागांत कमिशनच्या अपेक्षेने राजकीय हस्तक्षेपदेखील वाढता आहे. परिणामी विदर्भ वगळता मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रातील अधिकारी या भागात काम करण्यास अनुत्सुक असतात. नुकत्याच घडलेल्या एका घडामोडीने याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.

मुख्यमंत्री, कृषी, अर्थ आणि ऊर्जा अशी सारी सत्ता केंद्र असलेल्या विदर्भात कृषीची ७० टक्‍के पदे रिक्‍त आहेत. अशा स्थितीत बदलीपात्र कर्मचारीदेखील या भागात रुजू होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारभार कसा चालवावा, असा प्रश्‍न पडला आहे. हतबल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी थेट कृषी आयुक्‍तालयाने हस्तक्षेप करीत या कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रुजू करण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे. 

३३ पैकी चौघे झाले रुजू कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नतीने कृषी अधिकारीपदी नियुक्‍ती मिळाली होती. यातील २० अधिकाऱ्यांना नागपूर विभागात, तर १३ जणांना अमरावती विभागात रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले. परंतु बहुतांशी पश्‍चिम महाराष्ट्रातील असलेल्या या कृषी अधिकाऱ्यांनी रुजू न होताच आपआपल्या भागातील गॉडफादरच्या मदतीने हातोहात बदली आदेश बदलून घेतले. नागपूर विभागात २० पैकी एक महिला कृषी अधिकारी रुजू झाली. ती गडचिरोलीची रहिवासी असल्याने रुजू झाल्याचे सांगितले जाते. अमरावती विभागात १३ पैकी ३ अधिकारी रुजू झाले; रुजू झालेले हे तीनही अधिकारी याच भागातील असल्याने रुजू झाले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT