संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुढील ऊस हंगाम लवकरच सुरू करावा लागणार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : अतिरिक्त उसाच्या दबावामुळे पुढील हंगाम एक महिना अगोदर सुरू करावा लागणार असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती अधिकाऱ्यांशी बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.

श्री. गायकवाड म्हणाले, नुकत्याच संपलेल्या साखर हंगामापेक्षा पुढील हंगाम अधिक आव्हानात्मक असून, या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात ४.९६ लाख टन, तर सांगली जिल्ह्यात ९.६२ लाख टन अधिक ऊस गाळपाला येण्याची शक्‍यता आहे. यामुळे या वर्षीचा साखर हंगामही एक महिना लवकर सुरू करावा लागेल, अशी माहिती या बैठकीला प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, कार्यालय अधीक्षक रमेश बारडे, विजय पाटील, मकरंद कुलकर्णी यांच्यासह कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. गायकवाड म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उसाचे क्षेत्र वाढले असून, त्यामुळे येणाऱ्या हंगामात गाळपासाठी जादा ऊस येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून साखर हंगाम पुढे जाण्याची शक्‍यता आहे. हे गृहीत धरून या वर्षीचा हंगाम एक महिना अगोदरच सुरू केला जाईल. वाढलेल्या ऊस क्षेत्राबरोबरच येणाऱ्या हंगामात ऊस तोड मजुरांची कमतरता हीसुद्धा मोठी समस्या असेल. यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्याचे आवाहन कारखान्यांना करण्यात आले आहे. 

२०११ मध्ये ऊस तोडणी यंत्राला कारखान्यांसह शेतकऱ्यांनीही विरोध केला होता; पण अलीकडे ऊस तोडणी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या वर्षीच्या हंगामात सर्वत्र किमान ३० ते ४० टक्के तोडणी यंत्रणा कमी आली, त्याचा मोठा फटका शेतकरी व कारखान्यांना बसला. आता मात्र कारखाने आणि शेतकऱ्यांना तोडणी यंत्राशिवाय पर्याय राहणार नाही.'

नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षा येणाऱ्या हंगामात दोन्ही जिल्ह्यांत मिळून १४.५५ लाख टन उसाचे जादा गाळप करावे लागणार आहे. ऊस लागवडीचे क्षेत्रच वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांसमोर हेच मोठे आव्हान असेल, असेही श्री. गायकवाड म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT