अकोला ः शेतकरी प्रश्नांवर वरवट बकाल येथे अायोजित अांदोलनात सहभागी राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
अकोला ः शेतकरी प्रश्नांवर वरवट बकाल येथे अायोजित अांदोलनात सहभागी राष्ट्रवादीचे पदाधिकारी. 
मुख्य बातम्या

शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादीचे अांदोलन

टीम अॅग्रोवन

अकोला  : कर्जमाफी, तूर-हरभरा खरेदी, नवीन पीककर्ज अादी मुद्यांवर सध्या शेतकरी त्रस्त झाला असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने वरवट बकाल येथे अांदोलन करण्यात अाले. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या नेतृत्वात हे अांदोलन झाले. 

पेट्रोल-डिझेलचे भाव त्वरित कमी करा, तूर आणि हरभरा खरेदी त्वरित सुरू करा, बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना विनाअट पीककर्ज पुरवठा करण्यात यावा, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, किडणीग्रस्त रुग्णांना दोन लाख रुपये व मृत्यू पावलेल्या कुटुंबातील नातेवाइकाला पाच लाख रुपये मदत द्या, गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या व वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ अादी मागण्यांसाठी हे अांदोलन झाले. 

आंदोलनात विश्वासराव पाटील, विश्र्वनाथ झाडोकार, तालुकाध्यक्ष नारायण ढगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज ठाकरे, मीर मुज्जफरअली, हरिभाऊ पुंडे, लक्ष्मण पुंडे, संदीप दामधर, महादेव सातपुते, राजेश गायकवाड, गणेश पाटील, बाळू गायकवाड, दुर्गासिंग सोळंके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT